डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली वचने मला दिलेली विसरून रात्र गेली ! डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला अश्रूंत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली ! मी मानिले मनाशी, माझेच सर्व तारे स्वप्नात हाय माझ्या बहरून रात्र गेली !