दोन जिवांचें प्रेम बिचारें
दोन जिवांचें प्रेम बिचारें विरघळलें संसारीं । जोवरि नव्हतें झालें मीलन तोंवरि त्याची गोडी ॥ संसाराच्या रणमैदानीं उतरलीं जेव्हां राजाराणी । प्रणयाचीं हीं नाजुक स्वप्नें कैसी उरतील सांग साजणी ॥ प्रेमधनाची झाली होळी । त्या होळीवर भाजूं पोळी । नांवहि मोठें, लक्षण खोटें, प्रेमाचें संसारी ॥