दुभंगून जाता जाता मी अभंग झालो ! चिरा चिरा जुळला माझा; आत दंग झालो ! सल जुनेच सलता सलता सुखावून गेले ! अन् हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले ! कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो ! किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो ! अन् असाच वणवणताना मी मला मिळालो ! सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो ! ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी ! निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी ! तरू काय? इंद्रायणीचा मी तरंग झालो !