दूर आर्त सांग कुणी छेडली
दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी एकाकीपण सरले मी माझी नच उरले भान असे हरले अन् मी झाले बावरी यमुनेचे हे पाणी चकित होय मजवाणी कानांनी प्राणांनी प्राशियली माधुरी कुठुनी हे येति सूर? लावितात मज हुरहुर तडफडतो फडफडतो प्राणविहग पंजरी मी मजला विसरावे बुडुनि सुरांतच जावे बासरी न दूर सखे, ती माझ्या अंतरी