दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया ! सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या ! असह्य एकलेपणा, आस आंसवी मिळे काय अंतरात ते अजून ना कुणा कळे झाकळून जाय गाव, ये तमास पूर या ! दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी दृष्टिभेटही नसे, काय सांगणे जनी एकवार तूच ये सखीस धीर द्यावया ! सलत सूर सनईचा वारियात कापरा सुकून पाकळी मिटे मूक भाव लाजरा फुलांत गंध कोंदला, वाट ना उरे तया !