दूर राहुनी पाहू नको रे प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे कसा इशारा तुला कळेना शब्द मिळाले सूर जुळेना कळली तुझी कला घे ना जवळ मला नखर्याचा रंग मला दावू नको रे प्रिया जाऊ नको रे अवतीभवती बहर फुलांचा भ्रमर लुटेना थेंब मधाचा लाजे कळी कळी गाली पडे खळी फिरवून पाठ असा राहू नको रे प्रिया जाऊ नको रे भाव मनीचे जाणून घ्यावे दोन जिवांचे धागे जुळावे सांगू कशी तुला माझ्या प्रीतफुला हुरहुर आज अशी लावू नको रे प्रिया जाऊ नको रे