दत्तदिगंबर दैवत माझे
दत्तदिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे अनुसूयेचे सत्त्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे तीन शिरे, कर सहा शोभती हास्य मधुर शुभ वदनावरती जटाजूट शिरि पायी खडावा, भस्मविलेपीत कांती साजे पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे आसू झरती सारे सात्त्विक भाव उमलती, हळुहळु सरते मीपण माझे