एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील सार्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या फुलतील कोमेजल्यावाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणुनी या वाहणार्या गाण्यांतुनी लहरेन मी, बहरेन मी शिशिरांतुनी उगवेन मी