एकतारीसंगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो गळा माळ शोभे आत्मरूप शांती भक्ति-भाव दोन्ही धरू टाळ हाती टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो भूक भाकरीची, छाया झोपडीची निवार्यास घ्यावी ऊब गोधडीची माया-मोह सारे उगाळून प्यालो पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला कुणी राव होई, कुणी रंक झाला मागणे न काही सांगण्यास आलो