एकटी शिवारी गडे
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा ! का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा? दाटली ग सांज बाई, दिवस बुडाया आला अंतरी कशाचा उजेड माझ्या झाला का असा अचानक हा डोले ग जोंधळा? तुज रात्रंदिवस ओढ ज्याची भारी धुंडीत तुला ती मळ्यात फिरे स्वारी तो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा ! लपंडाव का असा? तोंड तरी पाहू दे ना अशीच मनीची प्रीत तुझ्या गाऊ दे होऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा !