PrintSource

एकदाच यावे सखया

Ekdach Yave Sakhaya

अशोक जी. परांजपे

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे धुंद त्या सुरांनी

असा चंद्र कलता रात्री रानगंध यावा
सर्व भान विसरून नाती स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गुज अंतरिचे हे कथावे व्यथांनी

एकदाच वाटेवर या तुला मी पहावा
भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा
असा शांत असता वारा रानपक्षी गावा
शब्दरूप प्रतिमा बघुनी जीव विरुनी जावा
स्वप्‍न हेच हृदयी धरिले खुळ्या आठवांनी