PrintSource

एकतारी गाते गीत विठ्ठलाचे

Ektari Gate Geet Vitthalache

योगेश्वर अभ्यंकर

एकतारी गाते
गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा
ध्वजा वैष्णवांची नाचे

मराठीचा बोल
बोल जगी अमृताचा
ज्ञनियांचा देव
देव ज्ञानदेव नाचे

नाचे चोखामेळा
मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे नामदेव
देव कीर्तनात नाचे

अनाथांचे नाथ
नाथ माझे दीनानाथ
भाग्यवंत संत
संतरूप अनंताचे