एवढेतरी करून जा हा वसंत आवरून जा ही न रीत मोहरायची आसवांत मोहरून जा तारकांपल्याड जायचे ह्या नभास विस्मरून जा ये उचंबळून अंतरी सावकाश ओसरून जा ह्या हवेत चंद्रगारवा.. तू पहाट पांघरून जा ये सख्या, उदास मी उभी आसमंत मंतरून जा