ग बाई बाई झोंबतो गारवा
चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल दोन उशा रेशमी, गरम लोकरी शाल पर झोप नाही आली, जागरण झालं काल रंगमहाली ऊब असून का काटा फुलतो नवा? ग बाई बाई झोंबतो गारवा ! अंग नाजूक ग मला रुतली उशी आली जांभई ग निजले बदलून कुशी खिडकीमधुनी खुणवत होता चवथीचा चांदवा ! रागारागानं मी गेले कोन्यात ग चिंब न्हाऊन मी पाहिलं ऐन्यात ग मनात माझ्या घुमु लागला मदनाचा पारवा ! आज आला तुम्ही, माझी केली कदर झाली नजरानजर, घेते लाजून पदर खुशाल यावं जवळ घ्यावं, धरून हात आडवा !