PrintSource

गा रे कोकिळा गा

Ga Re Kokila Ga

पी. सावळाराम

भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत गा
गा रे कोकिळा गा

सप्तसुरांचा स्वर्ग उभारून
चराचराला दे संजीवन
अक्षय फुलवित हे नंदनवन, पर्णफुलांतुन गा

कुहुकुहु बोलत मधुर गायनी
मोहित होता सारी अवनि
कुसुमकोमला ही वनराणी, नाचत थयथय गा

मन्मथ मनीचा इंद्रधनूला
शर पंचम तो लावुनी आला
प्रीत भेटता अनुरागाला, मीलन होऊन गा