गाव तुझा तो पैलतिरी
गाव तुझा तो पैलतिरी, गाव माझा ऐलतिरी रोज आपुल्या त्या नजरांचा संगम-सेतू बांधायाचा सप्त-सुरंगी इंद्रधनूपरी पाण्यावरती अधांतरी लाल-बदामी नवखे पाणी हुरळुनि चुंबित हिरवी धरणी मन विरघळता कणाकणांनी, प्रीत नहाते महापुरी शब्द थांबला कवितेसाठी आली कविता शब्दासाठी अर्थ रंगता अपुल्या ओठी, गुंजत राहू एकसुरी