PrintSource

गडद जांभळं भरलं आभाळ

Gadad Jambhala Bharala

ना. धों. महानोर

गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला
झाडांच्या गाण्याला मखमाली झीळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

सांजंच्या मलूल धुरवळ येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ