गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा आज मला जायचे रे माझ्या माहेरा ! सोडायचे घर आज पहिल्यानी टचकन् डोळ्यांना आलं रे पाणी डोळे पुसायाला आला माहेरचा ओळखीचा वारा ! सोनियाची पश्चिम डोंगराच्या मागे तिथे माझ्या माउलीचे प्रेम रे उभे आईसाठी घरट्याला जाईल पुन्हा पाखरू भरारा ! आई तुझी लेक नेली परक्यांनी गंगेला मिळाले यमुनेचे पाणी फिरून पुन्हा मिळेल मला माउलीच्या मायेचा उबारा ! नदीच्या काठाला बाबांचे घर तिथे आठवणींची भरे घागर दादासंगं जाईन पुन्हा पावसात वेचाया गारा !