गड्या रे प्रपंच हा लटका गुरफटता मायाजालि नाहि रे सुटका कामिनी रूपसुंदरा धनदौलत येई घरा उदराचा भरशी दरा कुरवंडी करशी काढुनि काळिज कुटका गड्या रे प्रपंच हा लटका क्षणभंगुर सुख ओसरे संसारी जीवन सरे घडिघडी गळे पाझरे किति जपशिल वेड्या देह कटोरा फुटका गड्या रे प्रपंच हा लटका तो दीनबंधु भूवरी वैकुंठ करी पंढरी आठवी सावळा हरी हरिनाम करील भवपार जिवाची सुटका गड्या रे प्रपंच हा लटका