गगनी अर्धा चंद्र उगवला
गगनी अर्धा चंद्र उगवला, मोहरले चांदणे अडली वाणी, मिटे पापणी, मिटली ग लोचने राहिले अर्ध्यावर बोलणे ! प्रथम बोलले तेच काहीसे मला न सुचले उत्तर कैसे भलत्या वेळी कसे बाई ग आठवले लाजणे? धीर धरून मी पुसता काही अस्फुट त्यांचे उत्तर येई शब्दाहुनही अधिक बोलके झाले मग पाहणे ! एक हाक ये दुरुनी साधी सिद्धीपुर्वी सुटे समाधी पुन्हा न जमले कधी त्यापरी एकान्ती भेटणे !