गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! सिंदुरचर्चित धवळे अंग, चंदनउटी खुलवी रंग बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया