गणराज रंगी नाचतो
गणराज रंगी नाचतो नाचतो पायि घागर्या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! कटि पीताम्बर कसुन भर्जरी बाल गजानन नर्तनास करी तुंदिल तनु तरी चपल साजिरी लावण्ये साजतो ! नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग धिमि वाजतो ! देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो !