गंध हा श्वास हा
गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो तूच तो तूच तो तूच तो ! हे धुंद डोळे नशिले नशिले मला वेड यांनीच रे लाविले हे ओठ राजा रसिले रसिले स्वप्नात रे मीच ओलावले हे ओळखीचे तुझे हासणे माझी मला खूण आता कळे या मनी जो कुणी दिलरूबा छेडितो तूच तो तूच तो तूच तो ! ये राजसा हा दुरावा कशाला घडी मीलनाची उभी राहिली या झिंगलेल्या गुलाबी निशेची किती काळ रे वाट मी पाहिली कितीही लपविले खरे रूप तू मी जाणिले कोण आहेस तू बहुरूपी जो कुणी खेळ हा खेळतो तूच तो तूच तो तूच तो !