PrintSource

गंध हलके हलके

Gandha Halke Halke

प्राजक्ता पटवर्धन

कोणी हळूच यावे माझ्या मनी फुलावे
आणि ओंजळीत घ्यावे गंध हलके हलके

स्वप्‍न ल्यायल्या नयनी चांद डोकावून जाई
तुझे चांदणे फुलावे धुंद हलके हलके
तुझ्या स्पर्शांनी फुलावे, सप्तसूर आर्त व्हावे
तार झंकारुनी यावे गीत हलके हलके

माझ्या ओठीचे तराणे तुझ्या ओठांनी टिपावे
तप्त श्वास मंद व्हावे माझे हलके हलके
माझ्या हाती रंग यावे धुंद जाहल्या मेंदीचे
आणि गंध तूही ल्यावे आज हलके हलके