"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी ! काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?" ती वनमाला म्हणे, "नृपाळा, हें तर माझें घर पाहत बसते मी तर येथें जललहरी सुंदर." "रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी तुला; तूं वनराणी, दिसे भुवनीं ना तुझिया रूपा तुला. अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी, भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."