गेला दर्यापार घरधनी
गेला दर्यापार, घरधनी, गेला दर्यापार ! पुरती ओळख नव्हती झाली अंगाची ना हळद निघाली अजुनी नाही देवक उठलं नाही उतरला गौरीहार ! पलटण घेउनी बोट चालली परतुनी राया कधी येणार? संसाराची स्वप्नं माझी अशीच का रे विरघळणार? डोळ्यांमधुनी झरती धारा धीरही सुटला पार घरट्याभवती मूक पाखरू असंच कुठवर भिरभिरणार?