PrintSource

घालिते मी शुभप्रभाती

Ghalite Mi Shubh Prabhati

गंगाधर महाम्‍बरे

घालिते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला
नेम माझा हाचि सदाचा, चुकू नये कधि काळा

महती जियेची कल्पतरूहुन
अशी तुळस ही माझ्या अंगणी
जळती पापे रुळता कंठी, पावन तुळशीमाळा

तुळशिदलाविण विष्णु भुकेला
धावती देव तिच्या हाकेला
पूजन करिता या लक्ष्मीचे काय कमी कोणाला?