घन घन माला नभी
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा वर्षाकालिन सायंकाळी लुकलुक करिती दिवे गोकुळी उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा कृष्णविरहिणी कोणी गवळण तिला अडविते कवाड, अंगण अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा