घननीळा लडिवाळा
घननीळा लडिवाळा झुलवु नको हिंदोळा ! सुटली वेणी, केस मोकळे धूळ उडाली, भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या सार्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा ! सांजवेळ ही, आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडामागे कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !