घनदाट रानी वाहे
घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी वेळुच्या बनात चाले वार्याचे गायन पाचोळ्याने भोवताली धरिले रिंगण वाजवितो बासरी का इथे चक्रपाणि दूरावर ऐकु येई सागराचे गीत निळेनिळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत ध्यान लावुनी बैसले ऋषीमुनीवाणी वार्यामध्ये ऐकु येई तुझे कानगुज चंद्रसूर्यतार्यांमाजी प्रभु तुझे तेज राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी