अर्ध्या रात्री यमुनापात्री कर त्याने धरिला गिरिधर वर वरिला, माई मी गिरिधर वर वरिला रंगरंग नित् मजसी खेळतो रंगनाथ माझा मी मेवाडी राजदुलारी, मथुरेचा तो राजा जगावेगळी लाभे सत्ता, ध्यास न दुसरा उरला गिरिधर वर वरिला फेर धरून मी नाच नाचले, न्याहळते श्यामा मीच राधिका, मीच रुक्मिणी, मीच तयाची भामा मुखी नाचते नाम तयाचे, ताल पैंजणी उरला गिरिधर वर वरिला कालिंदीच्या तटी कलयुगी रोज रंगते होरी भिजे ओढणी भिजे कंचुकी, भिजती अंगे सारी आनंदाचा पडतो पाऊस, मेघ सावळा झरला गिरिधर वर वरिला