PrintSource

गिरिधरापुढे या नाचिन मी

Giridhara Pudhe Ya Nachin

श्रीकृष्ण पोवळे

गिरिधरापुढे या नाचिन मी
नाचून रिझवीन प्रिय रसिकाला
प्रेमीजनांना दुखवीन मी

प्रीतीची घालून घुंगुरे
रतीवसने परिधानीन मी
गिरिधरापुढे या नाचिन मी

लोकलाज कुलमर्यादा
पैकी काही न ठेवीन मी
गिरिधरापुढे या नाचिन मी

रायाच्या पहुडेन पलंगी
रंगे मीरा हरीप्रेमी
गिरिधरापुढे या नाचिन मी