गोड गोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे नथणी-बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरी भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी लग्नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी अंतरपाट सरे, शिवा पार्वती वरे, लाडकी ही जाई ताई दुरी