PrintSource

गोल तुझ्या शरीराचा डौल

Gol Tujhya Shariracha

शाहीर होनाजी-बाळा

गोल तुझ्या शरीराचा डौल वर गोरा रंग नवती कवळी
वय नूतन हातीं निर्‍या चालणें चपळ जशी नागीण पिवळी

अधरपुटीं बत्तीस हिरकण्या एका वळीनें विराजती
ओठ शुद्ध पवळ्याचा रंग, नासाग्रीं पाहून रावें रिझती
मंजूळ स्वर ऐकून कोकिळा वृक्षीं बसुनी मनीं गजबजती
जानुजंघ सुकुमार पोटर्‍या अति नाजूक ग कर्दळी