गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला ही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वत:च देती त्यास योग्यता देव म्हणुनी कुणी न भजावे फुका शेंदरी दगडाला ! कुणी न रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी यासाठी ही झिजते वाणी मी जातीचा धोबी देवा, धुवीन कपडा मळलेला ! हेच मागणे तुला श्रीहरी घाम गाळी त्या मिळो भाकरी कुठेच कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको रिणकरी, कुणी न विटो नर जन्माला !