PrintSource

गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा

Gorya Gorya Tachat Kata

जगदीश खेबूडकर

आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला

(सुया आणा ग, बिब्बं आणा ग, वाटून लावा झाडपाला
हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला)

सरसरून कळ ही आली
डोळं मिटलं नि बसले खाली
दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला

(अंगारा लावा, कोंबडं कापा, घेऊन या ग देवऋषाला
हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला)

कुणी येऊन सावरा मला
काटा काढायची दावा कला
उसासा देता धागा चोळीचा नको तिथं तुटला
गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला

(काटा बी न्हाई, काहीच न्हाई, नुसतीच आलीया लाडाला)
न्हाई माज्या टाचंत काटा रुतला