Back
Fitting…

1 page

इलुसा हा देह

इलुसा हा देह, किती खोल डोह
स्‍नेह प्रेम मोह मांदियाळी

चेहर्‍यामागचा चेहरा कल्लोळ
आरशात लोळ बिंब जाळी

काय आहे पुण्य? काय आहे पाप?
चंदनाला साप कवटाळी

शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्याची उणीव आली भाळी

इलुसा हा देह

इलुसा हा देह, किती खोल डोह
स्‍नेह प्रेम मोह मांदियाळी

चेहर्‍यामागचा चेहरा कल्लोळ
आरशात लोळ बिंब जाळी

काय आहे पुण्य? काय आहे पाप?
चंदनाला साप कवटाळी

शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्याची उणीव आली भाळी

इलुसा हा देह

इलुसा हा देह, किती खोल डोह
स्‍नेह प्रेम मोह मांदियाळी

चेहर्‍यामागचा चेहरा कल्लोळ
आरशात लोळ बिंब जाळी

काय आहे पुण्य? काय आहे पाप?
चंदनाला साप कवटाळी

शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्याची उणीव आली भाळी