इतकेच मला जाताना सरणावर कळले होते- मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ! गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया, पाऊल कधी वार्याचे माघारी वळले होते? मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी.. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते ! याचेच रडू आले की जमले न मला रडणेही- मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते घर माझे शोधाया मी वार्यावर वणवण केली- जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते ! मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो.. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !