इथे मिळाली सागर-सरिता
इथे मिळाली सागर-सरिता, ही प्रीतीची एकरूपता इथे मिळाली ! कमलफुलांचे सुगंध सिंचन की भ्रमराला गोड निमंत्रण मिटे पाकळी मीलन घडता, ही प्रीतीची एकरूपता इथे मिळाली ! या धरणीची हाक ऐकिली, निळे गगन हे झुकले खाली क्षितिजावरही प्रेम सांगता, ही प्रीतीची एकरूपता इथे मिळाली ! बांधु अपुले घरकुल चिमणे, तुझियासाठी माझे जगणे मरणा येईल चिरंजीविता, ही प्रीतीची एकरूपता इथे मिळाली !