चला जाउ द्या पुढे काफिला अजुनी नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू ! जाताजाता जरा विसावा एक रात्र थांबू इथेच टाका तंबू ! थोडी हिरवळ, थोडे पाणी मस्त त्यात ही रात चांदणी उतरा ओझी, विसरा थकवा सुखास पळभर चुंबू इथेच टाका तंबू ! अंग शहारे जशी खंजिरी चांदही हलला, हलल्या खजुरी हलल्या तारा हलला वारा नृत्य लागले रंगू इथेच टाका तंबू ! निवल्या वाळूवरी सावली मदमस्तानी नाचु लागली लयीत डुलती थकली शरिरे नयन लागले झिंगू इथेच टाका तंबू !