इवल्याइवल्याशा टिकल्याटिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी ! निळीनिळी वाट निळेनिळे घाट निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट निळ्यानिळ्या डोंगरांत निळीनिळी दरी ! ऐक मजा तर ऐक खरी ! चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे सोन्याची केळी, सोन्याचा पेरू सोनेरी अंब्याला सोन्याची कैरी ! ऐक मजा तर ऐक खरी ! देवाच्या घरात गुलाबाची लादी मऊमऊ ढगांची अंथरली गादी चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी ! ऐक मजा तर ऐक खरी !