PrintSource

जाग बन्सिधरा जाग

Jaag Bansidhara Jaag

राजा बढे

जाग बन्सिधरा जाग, जाग नंदलाला
सरली रात ये पहाट मिटली चंद्रशाला

घराघरात आहट ये, उघडली कवाडे
सळसळतो पिंपळ ती झुळुक झुलवी झाडे
चिवचिवती भूपाळी तुज विहंगमाला

गिरीवरती पुसट दिसे अरुण रंगमाला
आली उन्हे अंगणात विणत किरणजाला
दर्शनास आतुरली उठी उठी गोपाला