जग हे बंदिशाला
जग हे बंदिशाला कुणी न येथे भलाचांगला, जो तो पथ चुकलेला ज्याची त्याला प्यार कोठडी कोठडीतले सखे सौंगडी हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी जखडे नजर न धावे तटापलीकडे उंबरातले किडेमकोडे उंबरि करिती लीला कुणा न माहीत सजा किती ते कोठुन आलो ते नच स्मरते सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला