जगाचे बंध कोणाला
जगाचे बंध कोणाला, जगाला बांधला त्याला ! मला जो थांबवी ऐसा, जगीं निर्बंध ये कैसा? जगानें देह हा केला, जगाला वाहिलें त्याला; हाणा मारा खुडा तोडा, परि आतां मला सोडा ! न कीर्तीला, न प्रेमाला, न सौख्याला, विलासाला, न विघ्नाला, न मृत्यूला, मला ये आडवायाला ! पुरे संबंध प्रेमाचा, नको हा खेळ प्रेमाचा, मिळे ज्या प्रीतिचा प्याला, विषारी तो असा मेला ! [१]