जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा । गमे या भ्रान्त संसारीं । ध्रुवाचा 'वेड' हा तारा ॥ कुणाला वेड कनकाचें । कुणाला कामिनी जाचे । भ्रमानें राजसत्तेच्या । कुणाचें चित्त तें नाचे ॥ कुणाला देव बहकावी । कुणाला देश चळ लावी । कुणाची नजर धर्माच्या । निशेनें धुंदली भारी ॥ अशा या विविध रंगाच्या । पिश्यांच्या लहरबहरींनीं । दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥