जन विजन जालें आह्मां । विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥ पाहें तिकडे मायबाप । विठ्ठल आहे रखुमाई ॥२॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥३॥ आठव नाहीं सुखदु:खा । नाचे तुका कौतुकें ॥४॥