जरा हळू जपून चल बाई ग करू नको उगीच अशी घाई ग यौवनप्रांतात पडे पाऊल पहिलेच गडे नंदनवन जग भासे छंद नवा गोड जडे बहरली नवति नवलाई ग हृदय-कुंजि मंजुळशी प्रणय-बासरी घुमली अधीर वृत्ती रंगुनि नव भाव-गुंजनी रमली मोहरली जिवाची आमराई ग सरळ सुखद दिसला तरी प्रणयमार्ग बिकट महा गंध मधुर मादक तरि फुलवरा विषारिच हा काटेकुटे लपले ठायि ठायी ग