जाशिल कोठे मुली तू
जाशिल कोठे मुली तू? नेशिल तेथे मुला तू ! नेऊ कुठे मी तुला सुंदरी स्वप्नात ने, यक्षभूमीवरी स्वप्न कोठे वसे? त्यात जावे कसे? हात हाती धरी संगती चाल तू ! प्रीतीचा प्रांत का अजून ना लागला भृंग गाती पहा चुंबताना फुला वृक्ष आणि लता, डोलती बिलगता पाहुनी घे गडे प्रीतीची रीत तू ! आनंद लाभे मना-लोचना प्रीतीमुळे ही फुले भावना ती कथा राहिली, प्रीत ना पाहिली पांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू?