Back
Fitting…

1 page

जातां पंढरीस सुख वाटे

जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ।
ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥

सेना ह्मणे खूण सांगितली संतीं ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

जातां पंढरीस सुख वाटे

जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ।
ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥

सेना ह्मणे खूण सांगितली संतीं ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

जातां पंढरीस सुख वाटे

जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ।
ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥

सेना ह्मणे खूण सांगितली संतीं ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥