जाऊं देवाचिया गांवां
जाऊं देवाचिया गांवां । घेऊ तेथेचि विसांवा ॥१॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥२॥ घालूं देवासीच भार । देव सुखाचा सागर ॥३॥ राहों जवळी देवापाशीं आतां जडोनि पायांशी ॥४॥ तुका ह्मणे आह्मी बाळें या देवाचीं लडिवाळें ॥५॥